पिंप्री नांदू पूल आणि खामखेडा पूल अंतुर्ली परिसरासाठी मोठी उपलब्धी – रोहिणीताई खडसे

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नाथाभाऊ कोणत्याही प्रकारच्या जाती पातीचं राजकारण  न करता फक्त मतदार संघाचा विकास हा एकच ध्यास घेऊन आजही ते काम करीत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मी सुद्धा भविष्यात जनसामान्यांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहील असा निर्धार रोहिणीताई खडसे यांनी आजच्या संवाद यात्रे दरम्यान सभेत ग्रामस्थांशी संवाद साधताना केल्याचे सांगितले.

 

रोहिणी खडसे या गावागावातील वैयक्तिक व सामूहिक समस्या ऐकून घेत आहेत. कार्यक्रमा दरम्यान नाथाभाऊनी गेल्या ३० /३५ वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा सुद्धा ग्रामस्थांसमोर मांडत आहे. आजच्या संवाद यात्रेप्रसंगी प्राधान्यक्रमाने रावेर तालुक्याला अगदी जवळच्या मार्गाने जोडणारा निंभोरासीम -पिंप्री नांदू पूल ही अंतुर्ली परिसरासाठी फार मोठी उपलबद्धी असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय नाथाभाऊंच्या दूरदृष्टीने उभारलेला खामखेडा पूल सुद्धा अंतुर्ली परिसरासाठी खूप महत्वाचा ठरला आहे. शासकीय कामकाजासाठी नागरिकांना मुक्ताईनगरला  येण्या – जाण्यासाठीचा फेरा कमी झाल्याने वेळ आणि पैशाची बचत  होण्यास मदत होत आहे.  या पुलांसह बोदवड तालुका निर्मिती, मुक्ताईनगर नामकरण सोहळा आदी ऐतिहासिक कामांची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

याआधी विनोद तराळ, सोपान पाटील, यु. डी. पाटील, ईश्वर रहाणे आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या विसाव्या दिवशी रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड, भोकरी, धामणदे, नरवेल येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर  रहाणे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी सभापती विलास भाऊ धायडे, किशोर  चौधरी, प्रदिप साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर, सुधिर तराळ,सोपान दुट्टे, माफदा अध्यक्ष रामभाऊ पाटील, भाऊलाल पाटील सर, आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांसह  ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content