पिंप्री प्रतिनिधी । पिंप्री खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने गावात छोट्या ट्रक्टरच्या मदतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्जंतूकीकरणासाठी ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्यात आली. तर गावातील प्रत्येक सदस्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पिंप्री खुर्द येथे गेल्या महिन्याभरात चौर्थ्यांदा सोडीयम हायड्रोक्लोराईडची ट्रक्टरद्वारे फरवारणी करून गाव निर्जंतूकीकरण करण्यात आली. उपक्रमाची सुरूवात जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, कोरोना समीतीचे अध्यक्षा तथा सरपंच योगिता विजय सुर्यवंशी, उपसरपंच इंदूताई देविदास चौधरी यांच्याहस्ते करण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच अरूण पवार, सरलाताई बडगुजर, ग्रा.पं. सदस्य मनोज पांडे, राकेश चौधरी, राकेश बिजविरे, अनुसया सोनवणे, गीताबाई सोनवणे, ग्रामविस्तार अधिकारी सुनिल बोरसे, पो.पा. गोपाळ पवार, तलाठी सचिन कलोरे, नाना बडगुजर, देविदास चौधरी, विजय सुर्यवंशी यांच्यासह अंगणावाडीसेविका, आशा वर्कर यांच्यासह युवक वर्ग उपस्थित होते. गावातील अंगणवाडी सेविका व आशा वर्करच्या माध्यमातून पुढील दोन दिवसात गावातील प्रत्येक घरात २०० एम.एल. सॅनिटायझर्स व प्रती सदस्य मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.