जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळ हुडको भागातील सिध्दार्थ नगरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री साडे दहावाजेच्या सुमारास घडली. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात २९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर यातील १६जणांना ताब्यात घेतले आहे. रात्रीतून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर महिती अशी की, पिंप्राळा परिसरातील हुडको भागातील सिंध्दार्थ नगरात सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गटात वादविवाद होत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, पो.कॉ. रूपेश ठाकरे, वाहन चालक संतोष प्रल्हाद पाटील व दोन होमगार्ड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ४० ते ५० जणांचा जमाव झाला होता. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले यात जमावाला शांत करत असतांना पोलीस कर्मचारी गोपाल चौधरी आणि रूपेश ठाकरे यांना किरकोळ जखमी झाले.
जमाव अधिक भडकल्याचे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीन अधिकची कुमक मागावण्यात आली. यावेळी जमावाने आक्रमक भूमिका घेतल्याने हल्ल्यात रूपांतर झाले. महिला व पुरूषांच्या दोन्ही गटाने एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात आठ जण जखमी झालेत. त्यांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकिया महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.
यांच्या गुन्हा दाखल
भागवत रामचंद्र सुरवाडे, शंकर वसंत निकम, बापु प्रकाश सोनवणे, दिपक जगन भालेराव, वसंत नथ्थु निकम, राजु वसंत निकम, राहूल नामेदव इंगळे, हितेश नाना बाविस्कर, लताबाई नाना बाविस्कर, सविता दिपक भालेराव, सिमा भागवत सुरवाडे, ज्योती पिंटू भालेराव, छाया वसंत निकम, कल्पना अशोक सपकाळे, गिता दत्तू बिऱ्हाडे, रेखा गोपाळ कचोरे, वर्षा संजय पवार, पुजा किरण सपकाळे, किरण अशोक सपकाळे, चेतन बाविस्कर, फकिरा अडकमोल, राहुल गजरे, अजय अशोक सपकाळे, मिना नाना कदम, शुभम संजय पवार, किरण किशोर खैरनार, रंजना किशोर खैरनार, विजय नाना कदम आणि आनंद प्रकाश सोनवणे सर्व रा. पिंप्राळा यांच्यावर दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीतून तर भागवत रामचंद्र सुरवाडे, दीपक जगन भालेराव, बापू प्रकाश सोनवणे, राजू वसंत निकम, वसंत नथ्थू निकम, शंकर वसंत निकम, राहूल नामदेव इंगळे, हितेश नाना बाविस्कर यांच्यासह इतर आठ जणांना अटक केली आहे.