जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वयोवृध्देच्या घरातून जावाई आणि नात यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कस्तुराबाई दशरथ ब्राम्हणे (वय-७०) रा. सिव्हिल हॉस्पिटलमागे पिंप्राळा हुडको मिळेल ते काम व भिक मागून आपला उदरनिर्वाह करते व एकटीच राहते. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कस्तुराबाई यांना भेटण्यासाठी सावत्र जावाई नवल बागुल आणि त्याची मुगली ठगुवाई हे भेटण्याच्या बाहाण्याने आले. गोड बोलून कस्तूराबाई यांना बोलण्यात गुंतवुन ठेवले. त्यात दोघांनी घराची झडती घेतली. घरातील लोखंडी पेटी मधील ५ हजार रूपये रोख आणि ८ हजार रूपये किंमतीची २०० ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मीची मुर्ती, ९ हजार रूपये किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे टॉप्स असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल काढून घेतला. पुन्हा पेटीला कुलूप लावून चावी कांद्याच्या टोपलीत टाकून दिली. दोघे थोडा वेळ थांबून निघून गेले. दरम्यान, कस्तुराबाई यांनी पेटी उघडून पाहणी केली असता त्यांना पैसे व दागिने चोरला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सोमवारी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.