पिंप्राळा परिसरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निधी, नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पिंप्राळा परिसरात २ कोटी ७३ लाख रुपयांच्या रस्त्याच्या मुख्य कामाचे उद्घाटन विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून पिंप्राळा परिसरासह प्रभाग क्रमांक १० मधील भागात विकास कामे प्रलंबित होते. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर येथील नागरीकांच्या मुलभूत सुविधा सोडविण्याचे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्थानिक रहिवाशांना दिले होते. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात या परिसरातील रस्त्यांच्या कामांसह इतर विकास कामांसाठी २ कोटी ७३ लाख रूपयांची निधी मंजूर करण्यात आला होता. पिंप्राळा येथून मुख्य रस्ता दोन ते तीन प्रभागांना जोडणारा असून या रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक सचिन पाटील, किशोर बाविस्कर, पार्वताबाई भिल्ल, सुरेश सोनवणे, शोभाताई बारी, शेख हसीनाबी, शेख शरीफ यांच्यासह पिंप्राळा परिसरातील रहिवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

Protected Content