पिंपळे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथील कै.सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठया मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. कार्यक्रमाचे उद्घाटन आटळे येथे सरपंच बापुसाहेब सदाबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर यांनी केले. या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कला गुण सादर करत प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली.विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले. आर्डीचे सरपंच यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. गोसावी सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकरिता एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान करावे व पालकांनी विद्यार्थ्यांना शेतात कामाला न पाठवता त्यांचा अभ्यास कडे लक्ष द्यावे,असे सांगितले. ग्रामिण भागातील शाळा प्रगती करत आहे आणि मातृभाषेतून शिक्षण यशस्वी जीवनासाठी कसे आवश्यक आहे? त्याचे महत्त्व देखील त्यांनी यावेळी विषद केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्डी सरपंच कैलास पाटील, पिंपळे बु.चे सरपंच सुभाष पारधी,लताबाई पाटील,मिनाबाई पाटील, जयवंतराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मच्छीन्द्र पाटील, गणेश पाटील,नरेंद्र चौधरी, बी पी पाटील, युवराज पाटील,दिनेश पाटील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सहशिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम संस्मरणीय केला.
विद्यार्थ्यांनी नयनरम्य कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. सूत्रसंचालन शिक्षक जगदीश पाटील यांनी केले. हिरालाल पाटील,सूर्यवंशी सर, पी डी पाटील,वाडीले तसेच इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व उपस्थितांचे आभार खैरनार सर यांनी मानले.

Add Comment

Protected Content