पिंपळे खुर्दला विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह सत्कार समारंभ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे सैनिक, गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कारासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन साई फाउंडेशनतर्फे करण्यात आले.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेला न्यूनगंड दूर झाला तर ते अपेक्षित यश सहज मिळू शकतात. यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे यांनी व्यक्त केले. पिंपळे खुर्द (ता. अमळनेर) येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन तसेच गुणवंत विद्यार्थी व भारतीय सैन्य दलातील जवानांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

ओम साई फाउंडेशनतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उमेश काटे यांच्या हस्ते करण्यात आले.  पिंपळे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सुरेंद्र सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, शेतकी संघाचे प्रशासक संजय पुनाजी पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंबाजी चौधरी, डी. बी. पाटील, पिंपळे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक उदय पाटील,  स्वप्नील पाटील, नारायण दामू पाटील, नाटू राघो पाटील, पिंपळे बुद्रुकचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील,  रेल्वे पोलीस जितेंद्र संभाजी पाटील, जयवंतराव पाटील, निबा दयाराम चौधरी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी भारतीय सैन्य दलातील जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला. यात सीआरपीएफ जवान राहुल नाना पाटील, हवाई दलातील जवान घनश्याम नारायण पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  पिंपळे बुद्रुक येथील (कै)सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालयात दहावीत प्रथम आलेला विद्यार्थी नितीन छोटू चौधरी व द्वितीय दिपाली अधिकार पाटील यांना सरपंच दिनेश प्रेमराज पाटील व भैय्या बारकू पाटील यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी “ओम साई”तर्फे गीतगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, धावण्याची स्पर्धा घेण्यात आल्या.

यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गणपती नृत्य, देशभक्ती गीते तसेच  “इडा पिडा टळु दे” ही नाटिका सादर करण्यात आली.  “ओम साई”चे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.

 

निकाल असा :-  निबंध स्पर्धा- (पाचवी ते सातवी) प्रथम- राज कैलास पाटील, द्वितीय तुषार अधिकार पाटील तृतीय कोमलशिंग पाटील, विद्यार्थिनीमध्ये प्रथम तेजल महेंद्र चव्हाण, द्वितीय धनश्री कृष्णा निकम तृतीय भाग्यश्री अरुण पाटील.

धावणे आठवी ते दहावी प्रथम भावेश धर्मेंद्र म्हस्के द्वितीय तेजस प्रमोद पाटील तृतीय रूपेश रामकृष्ण पाटील. विद्यार्थिनीमध्ये प्रथम खुशी संदेश जैन, द्वितीय साक्षी मदनसिंग पाटील, तृतीय उमिता विनोद पाटील. रांगोळी स्पर्धा प्रथम जयेश्री अशोक पाटील व डिंपल रविंद्र सैंदाने, द्वितीय जागृती सुनील पाटील, तृतीय गौरी नरेंद्र चौधरी. चित्रकला स्पर्धा आठवी ते दहावीच्या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रथम कल्पेश गोविंदा चौधरी द्वितीय पूर्वा कैलास पाटील

 

Protected Content