यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरुड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
पिंपरुड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील ’कृषीदूत ’ येथे दाखल झाले आहेत. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमां तर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती माती व पानी परीक्षण तसेच कीड व रोग याचे एकात्मिक व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन, शेतीविषयक विविध समस्या त्यावरील उपाययोजना आदी विषयाचे सखोल विश्लेषण या कृषितांकडून करण्यात येत आहे.
महाविदयालयाचे विदयार्थी स्वप्निल कटरे, आदित्य गणगे, गौरव पारसकर, नागार्जुन इंगळे, सौरभ दुधबडे, नित्नेश भवर, जयेश देशमुख,वृषभ लोखंडे हे कृषिदूत पिंपरूड येथे पुढील काही आठवडे पदवीत आत्मसात केलेल्या कृषिविषयक ज्ञानाचा उपयोग करून परिसरातील शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांना पिंपरूड ग्रामपंचायत, परिसरातील प्रगतशील शेतकरी तसेच सरपंच सौ मंगला योगेश कोळी यांच्या उपस्थितीत शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.एस. सदार तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. बी.एम. गोनशेटवाड यांचे मार्गदर्शन लाभले.