पिंपरी चिंचवड वृत्तसंस्था । पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९१ वर पोहोचली आहे. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी परिसराचा समावेश असलेल्या ‘अ’ प्रभागात सध्या सर्वाधिक म्हणजे १५४ कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. गेल्या दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरातील ३७ तर शहराबाहेरील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय.
आतापर्यंत शहरातील ३९१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या २१३ आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी चिंचवड शहराबाहेरील ४९ जणांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एकूण १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर शहराबाहेरील एकूण १७ रुग्ण घरी गेले आहेत. आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर शहराबाहेरील १० जणांनी प्राण गमावले आहेत. एकूण १७ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद आहे.