पिंपरी चिंचवड वृत्तसंस्था । कोरोना संक्रमित असलेले पिंपरी चिंचवड येथे पहिले दाखल झालेल्या १२ रूग्णांपैकी ११ जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना आता डिस्चार्ज देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचे पहिले तीन रुग्ण १२ मार्च रोजी आढळले होते. ज्यांना २७ मार्चपर्यंत ठणठणीत झाले आहे. २८ मार्चला आणखी ६ रुग्ण बरे झाले होते. पिंपरी चिंचवडने करोनावर यशस्वीपणे मात केल्याचे दिसत असतानाच दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेले दोन जण करोनाबाधित असल्याचं आढळून आले. फिलिपिन्समधून आलेला हा रुग्ण करोनाबाधित असल्याचे १८ मार्च रोजी स्पष्ट झाले होते. शहरात सध्या दिल्लीतून तबलिघीच्या कार्यक्रमातून आलेले २ आणि पहिल्या रुग्णांपैकी १ असे तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत.