कासोद्यातील जि.प. शाळेत पालक व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप

कासोदा प्रतिनिधी । शासनाच्या आदेशानुसार कासोदा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप शाळेतील विद्यार्थी व पालकांना नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कासोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.२ या ठिकाणी पटावरील ९३ विद्यार्थ्यांचे समप्रमाणात पालक व विद्यार्थ्यांना शिल्लक तांदूळ डाळी व धान्य आदी मालाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणाधिकारी बी.एस. अकलाडे यांच्या ३० मार्चच्या आदेशाचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे पत्राची अंमलबजावणी १ एप्रिल २०२० रोजी मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप क्षिरसागर, पत्रकार राहुल मराठे, कार्यकर्ते अनिल शेलार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्याहस्ते सोशल डिस्टनिंग अंतर ठेवून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना डाळी, तांदुळ, आधी धान्य वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सरदार यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी स्वच्‍छतेचा संदेश दिला. सोशल डिस्टन विषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थी व पालकांना घरी राहण्याबाबत सूचना केल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलिप क्षिरसागर, उपाध्यक्ष, सदस्य, पत्रकार, अनिल शेलार, शाळेचे उपशिक्षक हिम्मत महाजन, उपशिक्षिका, स्मिता पाटील, स्वयंपाकिंन मनिषा शेलार, यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content