पाहन येथील भावंडाच्या रुग्ण सेवेच्या कार्याला २ वर्ष पूर्ण

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील अकिल व शकील हे दोघे भाऊ निस्वार्थीपणे मगील दोन वर्षापासून अविरतपणे रुग्ण सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अकिल व शकील हे दोघे बंधू आपले पेशाने शिक्षक असेले आजोबा तारामिया हरीमिया पटेल यांचा सेवेचा वारसा पुढे चालवीत आहेत. कोरोना काळात रुग्णांना रुग्णालयात नेतांना धीर देणे, आधार देवून गाडीत बसविणे एवढेच नाहीतर त्या रुग्णाची माहिती संबधित डॉक्टरांना देण्याचे काम देखील चोख बजावत असतात.  त्यांचे वडील अपंग असून त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. यातच जेव्हा रुग्ण त्यांच्याकडे मदतीसाठी येतो तेव्हा ते कोणतीही सबब न सांगता आपली गाडी काढून त्यांना इच्छीत स्थळी सुखरूप पोहचवितात. त्यांच्या मोफत रुग्ण सेवा कार्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी त्यांनी दानशूर व्यक्तींनी त्यांच्या रुग्ण सेवेत मदत म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी व आपल्या रुग्ण सेवेत सामील व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Protected Content