पावसाळ्यात शहरातील मलनिस्सारण , जलवाहिन्यांची कामे बंद ठेवा ; मनसेची मागणी(व्हिडिओ)

जळगांव : प्रतिनिधी । पावसाळ्यात शहरातील मलनिस्सारण , जलवाहिन्यांची कामे बंद ठेवा अशी मागणी आज  मनसे जिल्हा संघटकांनी महापालिका आयुक्तांकडे केली

 

राजेंद्र  निकम (मनसे जिल्हा संघटक,रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग ) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज हे निवेदन दिले  शहरामध्ये अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेचे काम पावसाळ्याचे ४ महिने बंद ठेऊन खोदकाम केलेले रस्त्यांचे मुरुम टाकून डागडुजी करण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे

 

शहरामध्ये अमृत अभियान पाणीपुरवठा योजना अंतर्गत खोदण्यात येत असलेल्या चाऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या संपूर्ण व्यवस्थित बुजणे व डांबरीकरण करणे ही संपूर्ण जबाबदारी मक्तेदाराची आहे परंतु मक्तेदाराने ती व्यवस्थित पार पाडल्याचे दिसून येत नाही. मलनिस्सारण योजनेच्या भुयारी गटारीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर चारी बुजविण्याची जबाबदारी मक्तेदाराची असली तरी डांबरीकरण जबाबदारी म.न.पा.ची आहे. म.न.पा.कडूनदेखील ही जबाबदार पार पाडण्यात येत नाही. यामुळे संपूर्ण शहर पावसाळ्यात चिखलमय झालेले आहे

 

मोटारसायकल व चारीचाकी वाहनचालक यांना वाहने चालवितांना कसरत करावी लागते. अनेकवेळा लहान-मोठे अपघात सुध्दा घडत आहेत. १८ ऑगस्टरोजी कासमवाडी येथील प्रौढाचे सायकलीचे चाक चिखलात रुतल्याने ते काढण्यासाठी ते गेले असता त्यांचा तोल जाऊन समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते दबले गेले व जागीच मृत्यू झाला.

चालू असलेले काम १५ दिवसांत पूर्ण करून नविन कुठेही खोदकाम करू नये, नविन खोदकाम निदर्शनास आले तर ते त्या क्षणी जागेवरच मनसेकडून बंद पाडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे

या निवेदनावर  मनसे जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, निलेश अजमेरा, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज भोई, निलेश खैरनार, बळीराम पाटील, अॅड.दिनेश चव्हाण,मंगेश भावे, संकेत सोनार, अजय परदेशी, भाईदास बोरसे, संदिप पाटील  आदींच्या सह्या  आहेत.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/866399583972880

Protected Content