धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथे दोन दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलीसांनी मदतीसाठी धाव घेतली.
याबाबत माहिती अशी की, पाळधी आऊट पोस्ट पोलीस स्थानकासमोर असलेल्या पाळधी खुर्द ग्रामपंचायतीचे शॉपींग कॉम्प्लेक्स मध्ये बेसमेंटला असलेल्या फर्निचरचे दुकान आणि रेफ्रिजरेटच्या दुकानाच्या समोर पडलेल्या सामानाला आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने दुकानातील फर्निचरचे साहित्य व जुने रेफ्रिजरेटर जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिक रहिवाशी आणि पाळधी पोलीसांनी मदतीसाठी धाव घेतली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.