पाळधी येथे ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी; तालुक्यातील दुसरी घटना

जळगाव प्रतिनिधी । पार्किंग केलेली ट्रॉलीसह ट्रॅक्टरची चोरी झाल्याची घटना आज सकाळी सावदा बायपासजवळ पाळधीत उघडकीस आली. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ममुराबाद येथेही ट्रॅक्टर रोटाव्हेटरसह चोरीस गेल्याचे आज उघडीस आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मश्चिंद्र उत्तम सोनवणे (वय-५२) रा. जळगाव यांचे खडी वाहन्याचे ट्रक्टर आहे. ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ००५३) आणि ट्रॉली क्रमांक (एमएच १९ बीक्यू ०११४) वर खडी ने आण करण्यासाठी चालक साहेबराव कौतीक बऱ्हाटे रा. पाळधी हा काम करतो. ट्रक्टरवर साहेबराव चालक असल्याने ट्रॉलीस ट्रॅक्टर त्याच्या ताब्यात होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रक्टर सावदा बायपासला पार्किंग करून लावले होते. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास कामावर जाण्यासाठी चालक साहेबराव गेला असता ट्रॉलीसह ट्रॅक्टर आढळून आले नाही. याप्रकरणी मश्चिद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content