पाळधी येथील प्रौढाची आत्महत्या; जागेच्या वादाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियाचा आरोप

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) । नावावर असलेले घराच्या नावावर असून खाली करण्याच्या जांचाला कंटाळून पाळधी येथील ५५ वर्षीय प्रौढाने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी पाळधी आऊट पोस्ट पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवाशी रमेश विठ्ठल पाटील (सोनवणे) (वय-५५) यांचे भजे गल्लीत त्यांच्या नावावर घर आहे. गावातील गुलाब हिरालाल फुलझाडे, सचिन गुलाब फुलझाडे आणि राहुल गुलाब फुलझाडे सर्व रा. पाळधी ता. धरणगाव यांनी रमेश पाटील यांचे ‘नावावर असलेले घर आमच्या नावावर असल्याने ती जागा खाली कर नाहीतर मला पैसे द्या व घर खाली केले नाही तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या पुतण्या मनोहर अमृत पाटील यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपींना अटक करावी यासाठी मयताच्या कुठुंबियांनी पाळधी पोलीस ठाण्यात मृतदेह आणण्यात आला होता. संशयित आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मयताचे नातेवाईक घरी परतले होते.

Protected Content