धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरसह ट्रालीची चोरी केल्याची घटना समोर आले आहे. या संदर्भात सोमवारी १५ मे रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र दत्तू जाधव (वय 31 रा. पाळधी खुर्द ता. धरणगाव जि.जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २० सीआर २०५६) यांच्या मालकीचे असून त्यांनी पाळधी गावातील अहमद शेख यांच्या घराजवळ पार्किंगला लावले होते. १३ मे ते १४ मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. यासंदर्भात ट्रॅक्टर मालक जितेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरचा सर्वत्र शोध घेतला, परंतु याबाबत कुठेही माहिती मिळाली नाही, अखेर सोमवारी १५ मे रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश रमेश भालेराव करीत आहे.