पाळधी खुर्द येथील विवाहितेचा विनयभंग व धमकी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी खुर्द येथील 35 वर्षीय महिलेचा दोन धरणे विनयभंग करून असले शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत गुरुवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथे विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे घर काम करून आपला उदरनिर्वाह करते दरम्यान गावातील जीवनसिंग उर्फ हंसराज रामसिंग प्रजाचितोडिया आणि लक्ष्मणसिंग रामसिंग प्रजाचितोडिया दोन्ही रा. पाळधी खुर्द ता. धरणगाव यांनी ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ केली. तसेच “तू पोलीस स्टेशनला तक्रार का दाखल करते, तू दाखल केलेली तक्रार मागे घे, नाहीतर तुला सोडणार नाही” अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. तसेच तुझ्या मुलीला गुंड लावून मुंबईला उचलून नेऊ अशी देखील धमकी दिली. त्याचप्रमाणे १२ नोव्हेंबर रोजी देखील हाच प्रकार घडला. हा प्रकार सहन न त्याने विवाहितेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जीवनसिंग उर्फ हंसराज रामसिंग प्रजाचितोडिया आणि लक्ष्मणसिंग रामसिंग प्रजाचितोडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.

 

 

Protected Content