पालखी, दिंडी मधील भक्तांची चिखली बु, खुर्दच्या गावकऱ्यांकडून सेवा (व्हिडिओ)

dindi

बुलढाणा, शेगाव प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव श्री संत गजानन महाराज विदर्भाची पंढरी म्हणून ओळख याच पंढरीला परिसरातील दिंड्या वर्षभर पायी दिंडी च्या माध्यमातून आपली श्रद्धा अर्पण करत असतात. त्याच माध्यमातून जिल्ह्यातील चिखली बुद्रुक ,चिखली खुर्द हे दोन गावे वारकरी यांची सेवा करतात व श्री प्रती आपली श्रध्दा अर्पण करतात.

याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या टीमने चिखली बुद्रुक या गावात जाऊन गावकऱ्यांचे सोबत पालखी सोहळा सेवेचा अविरत महत्व जाणून घेतले. चिखली बुद्रुक हे गाव जळगाव ते शेगाव या मार्गावर दिंडी करिता विशेषतः रात्रीचा मुकमा करिता सोईचे ठिकाण. कारण येथून शेगाव हे जवळपास २५ किमी दूर आहे. त्यामुळे रात्रीचा मुकमानंतर बहुतांश दिंड्या शेगाव येथे सोयीने पोहोचतात. याकरिता याच मार्गावरील चिखली बुद्रुक या गावकऱ्यांनी पुढाकार घेत या गावाला एक नवीन ओळख दिली आहे. वारकऱ्यांचे सेवेचे गाव असे चिखली बुद्रुक याला म्हटलं वावगे ठरणार नाही. यासंपूर्ण बाबत आम्ही गावकरी यांच्याशी थेट संवाद साधला व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर पाहूया एक अभिनव असे गाव पालखी दिंड्यांचे सेवा गाव याच माध्यमातून आपली अभिनव सेवा अर्पण करीत आहे.

 

 

Protected Content