जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत व महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते ‘विजयी गदा’ भेट देऊन निरामय आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना ‘विजयी गदा’ भेट देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेनेचे जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, खुबचंद साहित्या आदी नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.