बुलडाणा, अमोल सराफ | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन ची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात psa प्लांट व इतर माध्यमातून तयारी करण्यात आली आहे. याच्या पाहणीस पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रारंभ केला आहे.
जिल्ह्यात सदर यंत्रणा व्यवस्थित रित्या सुरू आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सुरू केली आहे. त्यांनी देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन किंवा औषधांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना दिल्या. यावेळी त्यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना टेस्टिंग सेंटरची देखील पाहणी केली.