पारोळा विकास चौधरी । आजवर कोरोनाला थोपवून धरलेल्या पारोळा तालुक्यात आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये एक बाधीत रूग्ण आढळून आला आहे. यामुळे ग्रीन झोन म्हणून असलेला लौकीक आता लयास गेला आहे.
सगळीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना पारोळा तालुक्यात आजवर या विषाणूचा संसर्ग झाला नव्हता. यासाठी प्रशानसाने केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले होते. तर जनतेनेही बर्यापैकी लॉकडाऊनचे पालन केल्यामुळे हा तालुका ग्रीन झोन म्हणून ओळखला जात होता. तथापि, आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये पारोळा तालुक्यातील एक बाधीत असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने नमूद केले आहे. परिणामी आता पारोळ्यातही कोरोनाने एंट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.