पारोळा शहरातील नऊ हजार घरात श्री बालाजी महाराज महाप्रसादाचे वाटप

पारोळा प्रतिनिधी | तालुक्याचे आराध्य दैवत प्रति तिरुपती श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मउत्सवाची सांगता झाली. तर दरवर्षी प्रमाणे घरोघरी जाऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ब्रह्मउत्सवाला यावर्षी ७ ऑक्टोबर पासून सुरवात होवुन २१ ऑक्टोबर रोजी पालखीच्या रूपाने त्याची सांगता करण्यात आली. महाप्रसाद समितीचे अध्यक्ष ए. टी. पाटील, श्रीकांत शिंपी, दिनेश गुजराती, डॉ. अनिल गुजराती, केशव क्षत्रिय, प्रकाश शिंपी, दिलीप शिरोडकर, प्रमोद शिरोळे, दत्ताजी महाजन, आकाश बडगुजर आदींच्या उपस्थितीत या प्रसाद वाटपाला घरोघरी जाऊन सुरवात करण्यात आली. प्रत्येकी चार लाडू प्रमाणे शहरात ९ हजार घरात ही पाकिटे म्हणजे ३६ हजार लाडू वाटप केली जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १०० स्वयंसेवक हे ते शिस्तबद्ध रीतीने घरोघरी जाऊन वाटप करीत आहे. पुणे येथील श्यामकांत शेंडे चार वर्षांपासून महाप्रसाद खर्चचे मानकरी आहेत. सतत ११ वर्ष ते महाप्रसाद खर्चाचे मानकरी आहेत. या महाप्रसाद मागे शहराची मोठी धार्मिक भावना व आस्था आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वतीने घरोघरी महाप्रसादाचे वाटप करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून ही घरोघरी वाटप केले जात आहे. यापूर्वी मंदिरातच महाप्रसादाचा लाभ हा दिला जात होता. दरम्यान या ९००० लाडू आचारी जगदीश शर्मा यांनी कुठलेही विना मोबदला घेता बनवून दिले आहेत.

Protected Content