पारोळा प्रतिनिधी । शहरासह ग्रामीण भागात देशी-विदेशी व गावठी दारूने उपद्रव मांडला आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये, अश्या सूचना आदेश असताना देखील अवैध दारू विक्री ठिकाणी मात्र गर्दी कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर टिटवी येथील गावकऱ्यांनी स्वतः शिवारातील गावठी हातभट्टीची दारू उध्वस्त करून गावातील आरोग्य आपल्याच हाती याचा प्रत्यय आणून दिला आहे.
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये गावठी हातभट्टीच्या दारूने पासून आपली ख्याती आजही कायम ठेवली आहे. आदिवासी समाजाचे काही लोक हे गावठी हातभट्टीची दारू पाडुन ते गावात सर्रासपणे विकतात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन पाळले जात आहे. परंतु या अवैध दारू विक्रेत्यांनी मात्र तो झुगारून देत आपला धंदा हा कायम ठेवला आहे. त्यामुळे गावागावातील आरोग्य धोक्यात आले.यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढण्याची देखील अधिक शक्यता निर्माण झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराची टिटवी येथील पोलीस पाटील विनोद पाटील ग्रा.प. सदस्य उदय पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख समाधान मगर, भरत नेरपगार, विलास मगर, विशाल पाटील आदी तरुण यांनी शिवारातील तीन ठिकाणचे गावठी दारू अड्डे व भांडे हे उध्वस्त गावातील गावठी हातभट्टी दारू विक्रीला चाप बसविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा या उपक्रमाचे सुज्ञ नागरिकांकडून कौतुक होत आहे.