पारोळा प्रतिनिधी । येथील चर्मकार महासंघातर्फे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारी रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार पारोळा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमा देण्यात आली. यासह सर्व शासकीय निम शासकीय कार्यालय, महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा यांना जयंती उत्सव साजरा करण्यासाठी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमा वाटप करण्यात आल्या यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष्ा लक्ष्मण महाले, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल वाघ, शिक्षक आघाडी संघाचे तालुकाध्यक्ष नितीन ठाकरे, युवाध्यक्ष मंगेश मोरे, खाजिनदार समाधान ठाकरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.