पारोळा येथे कानुबाई मातेची परंपरा आजही कायम

parola 1

 

पारोळा प्रतिनिधी । शहरातील लाडशाखीय वाणी समाजात धार्मिक, पारंपरिक आणि परंपरेनुसार परिवारातील मुला-मुलीचे लग्न विवाह जमला की, विविहापुर्वी किंवा विवाहानंतर कानुबाई मातेचा उत्सव थाट करण्याची आज ही परंपरा कायम आहे.

याबाबत सविस्तर असे की, नावरकर परीवारात गेली १०-१२ वर्षापासून दु:खत घटनेमुळे कार्यक्रमाला खंड झाला असल्याने परीवारातील कानुबाई माता ही पुंडलिक गोपाळ नावरकर यांच्याकडे असुन या वर्षी कानुबाई मातेच्या मुर्तीस नव्याने घडवुन नवी वस्त्र परिधान करून उंबरखेड येथे कानुबाई मातेचे ठाणे मंदिर येथे भेट घालुन पारोळ्यातील मिलिंद नावरकर याच्याकडे कानुबाई मातेची दि.७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी वाद्यासह मिरवणूक व कुंभाराकडुन चुल त्यास पारंपारिक रतन शब्दाने संबोधिले जाते. तर कानबाई मातेस जो नैवेद्य दिला जातो ते शिजवण्यासाठी पाणी विहीरी वरून वाद्यासह मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर दुध, भात व दहीचा नैवेद्य दाखविण्यात येऊन अत्यंत सध्या कुटुंबीक पध्दतीने कार्यक्रम करून रात्री मातेच्या गीत गायनाने जागर करण्यात येते.

तसेच लाडशाखीय वाणी समाजाचे गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या अधिवेशनात समाजात होत असलेले धार्मिक कार्यक्रम, कानबाई थाट, विवाहा प्रसंगी होणारा साखरपुडा, शिष्टाचार, विवाहा वर होणारा खर्च, विवाहा प्रसंगी दिल्या जाणाऱ्या भेट वस्तू इत्यादी कार्यक्रम बंद करून, अनाठायी खर्च कमी करण्यात यावा. या ठरावाच्या अनुषंगाने आपणही समाजाचे एक घटक असुन सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांनी अंत्यत साध्या पद्धतीने कार्यक्रम करून शहरात व समाजात चांगली परंपरा सुरू केली असुन सर्वानी यांचा आदर्श घ्यावा व जे कार्यक्रम आपल्या परिवारात मर्यादीत असून अनाठायी खर्च टाळा असे आवाहन विजय नावरकर यांनी यावेळी केले आहे.

Protected Content