पारोळा येथील सदानंद भावसार यांना कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर

पारोळा प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा राज्य शाखा कर्नाटकतर्फे भावसार कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाला असून रविवार ७ फेब्रुवारी २०२१ रोजी झूम मिटींग मध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रदान केला जाणार आहे.

आदर्श निवृत्त शिक्षक स.ध. भावसार यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल २० पुरस्कार आणि कोरोना काळातील कोरोना बाधितांसाठींच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यभरातील विविध संस्था/ संघटना कडून कोरोना योद्धा म्हणून २० सन्मानपत्रे मिळाली असून हा २१ वा पुरस्कार आहे.

भावसार सरांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल पैठण, नाशिक, धुळे, शिरपूर, जळगाव, भुसावळ, अमळनेर, फैजपूर व एरंडोल येथील भावसार समाजातील पदाधिकारी व बंधु- भगिनी आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content