पारोळा प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भेट देवून उपस्थित वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून माहिती व आढावा घेतला. दरम्यान, डिस्चार्ज दिलेल्या १२ रूग्णांची चौकशी केली.
येथील कोवीड केअर सेंटरला शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संयुक्तरित्या भेट दिली. यावेळी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची पाहणी करून डॉक्टरांशी चर्चा केली. दरम्यान शनिवारी १२ रूग्ण कोरोना बाधित होते. त्यांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. यावेळी त्यांची देखील विचारपूस करून चौकशी केली. रुग्णांनी वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे यांचे कौतूक केले. मयत झालेल्या रूग्णावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही सुचना देण्यात आल्यात. यावेळी वैद्यकिय अधिकारी योगेश साळुंखे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, प्रांताधिकारी गोसावी व अन्य अधिकारी उपस्थित होते.