पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील कृषि केंद्रांवर युरिया व इतर खतांचा आवश्यक व पुरेसा साठा असतांना सुध्दा केंद्र चालक खतांच्या टंचाईचे कारण शेतकऱ्यांना सांगत असल्यामुळे चढ्या भावाने खतविक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याची तक्रार माजी आमदार डॉ. सतिश पाटील केली. पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त करत तालुका कृषि अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष योगेश रोकडे, युवक शहराध्यक्ष संजय बागडे, विद्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष कैलास पाटील, विद्यार्थी जिल्हासरचिटणीस लोकेश पवार, युवक जिल्हासरचिटणीस अजय बोरसे, विद्यार्थी शहराध्यक्ष विशाल बडगुजर, सिद्धू महाजन, यश ठाकूर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.