धरणगावात ‘राष्ट्रवादी’तर्फे भाजपा आमदार पडळकर यांचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

धरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याविषयी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या जाहिर निषेध करत व त्यांनी जाहीररीत्या माफी मागण्यासंबंधीचे निवेदन आज धरणगाव तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. एका राजकारणातील अभ्यासू व्यक्तीमत्वाचा अपमाने केला आहे. बदनामकारक व अपमानासारखे व्यक्तव्य केल्याप्रकरणी आमदार पडळकर यांनी जाहीररित्या शरद पवार यांची माफी मागावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी ज्ञानेश्वर महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील, युवक तालूकाध्यक्ष नाटेश्वर पवार, बाजार समिती संचालक रंगराव सावंत, मोहन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद देवरे, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, निलेश चौधरी, गंगापूरी सरंपच अनिल पाटील, नारायण चौधरी, साखरेचे घनःश्याम पाटील, पिंप्री सरपंच विजय सुर्यवंशी, सिताराम मराठे, भोणे येथील संजय पाटील, भवरखेडयाचे श्यामकांत पाटील, किरण पाटील, गिरीष पाटील, पिंप्रीचे प्रशांत बच्छाव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content