जळगाव : प्रतिनिधी । पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायातून अनेक प्रस्ताव दिले गेले होते , राज्य सरकारने त्या प्रस्तावांवर विचार केला असता तर बरे झाले असते अशी खंत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली
या संदर्भात एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की , राज्यात अनेक वर्षांची ही पायी वारीची परंपरा आहे आम्हीसुद्धा मुक्तीनगरमधून पायी वारीने हजारो लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो यंदा सरकारने आम्हाला एस टी बसमधून १०० लोकांना जाण्याची परवानगी दिली आहे . गेल्यावर्षी आणि यंदा पण कोरोनामुळे या परंपरेला छेद द्यावा लागला आहे ही सल आहेच कारण प्रत्येक वारकरी आपल्या आयुष्यात आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनाला आसुसलेला असतो . राज्य सरकारने वारकरी संप्रदायाकडून आलेल्या विविध प्रस्तावांचा विचार करायला हवा होता , असेही ते म्हणाले .