जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौकात पायी जाणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार १ सप्टेंबर रोजी कारचालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर युवराज गवळी (वय-१९) रा. कांचन नगर, गवळीवाडा, शनिपेठ जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवार ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सागर गवळी हा शहरातील शास्त्री टावर चौकात असलेल्या शारदा बुक डेपो समोरून पायी जात असताना भरधाव कार क्रमांक (एमएच १९ डीजे ७६७९) ने त्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गुरुवार १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रवींद्र सोनार करीत आहे.