जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावात गेल्या १३ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येत्या दोन दिवसात समस्या न सोडल्यास नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारात भाजपच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील येथील नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून १३ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरीक मिळेल तेथून पाणी आणत असल्याने दुषीत पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यास शासन जबाबदार राहील. येत्या दोन दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर हंडा मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर नशिराबाद शहर भाजप पदाधिकारी डॉ.पंकज इंगळे, बापू बोढरे, किरण भोजराज पाटील, दिपक हरी सोनवणे, आनंदा धनराज रंधे यांच्या सह्या आहेत.