पाडळसरे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना

अमळनेर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसरे येथील तिरंगा गणेश मित्र मंडळाने एक गाव एक गणपतीची स्थापना केली आहे. या गणेशाची आरती एपीआय जयेश खलाने यांच्या हस्ते करण्यात आली.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तके गाव एक गणपती मंडळ ही संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेस प्रतिसाद देत पाडळसरे येथील तिरंगा गणेश मित्र मंडळाने एक गाव एक गणपतीची स्थपना केली आहे. शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची महाआरती मारवड पोलीस ठाण्याचे e एपीआय राजेश खलाने यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी मंडळाचे अध्यक्ष गौरवकुमार पाटील, उपाध्यक्ष लोकेश गुर्ज, निलेश पाटील, संजय गुर्जर, कल्पेश पाटील, सागर पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून एपीआय राजेश खलाने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, गोपाल कोळी, माजी उप सरपंच रवींद्र पाटील, भूषण पाटील, अभिमन कोळी आदींसह तिरंगा गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content