अमळनेर प्रतिनिधी । आजच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी भरीव निधी न मिळाल्याने यासाठी सुरू असलेले आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
अमळनेर येथिल पाडळसरे धरणास महाराष्ट्र शासनाने जनआंदोलनाचा रेटा असतांनाही बजेट मध्ये तुटपुंजी तरतूद करून महाकाय पाडळसे धरणाच्या लाभार्थी सहा तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.म्हणून आता आंदोलन उग्र करू! असे जनआंदोलन समिती तर्फे पदाधिकारी सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटिल यांनी सांगून तिव्र रोष व्यक्त केला. पाडळसरे धरणासाठी बजेट मध्ये फक्त ३२ कोटी ५० लक्ष रुपये जाहीर झाल्याने संतप्त आंदोलक सचिन पाटिल, रणजित शिंदे,अरुण देशमुख,नरेंद्र पाटील, शिवाजीराव गांधलीकर, रविंद्र पाटील आदींनी रस्त्यावर उतरून संघर्ष तिव्र करू असे जाहिर केले. तर अमळनेरच्या दोन लोकप्रतिनिधिंच्या महत प्रयत्नानंतर आणि जनआंदोलन सुरू असतानाही शासनाने दिलेल्या तुटपुंज्या निधींबाबत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी खेद व्यक्त केला.
दरम्यान, लोकांची उत्स्फूर्त गर्दी वाढत गेल्याने आंदोलनाची धार वाढली आहे. जनआंदोलनाला अध्यात्मिक जोड देत भजनी मंडळानीही दिवसभर टाळ व वाद्यवृंदासह भजनाच्या नादातधरण झालेच पाहिजे! घोषणांच्या गजरासह आंदोलनास पाठबळ दिले. तर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ने धरण आंदोलनाची चित्रफीत व भव्य धरणाच्या प्रतिमेचे प्रकाशन करून अमळनेरच्या जनतेचे आणि धरण जनआंदोलनाचे स्वप्न साकार होतांनाचा आशावाद व्यक्त केला. आंदोलनात दिवसभर सक्रिय उपस्थिती लावून फोटोग्राफर व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला. यावेळी महेंद्र पाटील, भगवान पाटिल,जयवंत ढवळे, शशिकांत पाटिल,विशाल चौधरी,मुख्तार सैय्यद, दिपक बारी,तुकाराम पाटिल, नारायण मिस्तरी,योगेश धवळे, सुशिल भोईटे,आबा पाटिल,भगवान वारुळे, प्रमोद चौधरी, राकेश भामरे,धीरज भामरे,किरण बागुल,गणेश पाटिल, आदींसह कृषिभूषण साहेबराव पाटिल, एस.एम.पाटिल, अजयसिंग पाटिल, एन.के.पाटिल, प्रशांत भदाणे,डी. एम.पाटिल, रणजित शिंदे, सुनिल पाटिल, देविदास देसले, सुनिल पवार, महेश पाटिल,आदि आंदोलनात उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघ, भावसार क्षत्रिय समाज,तेली युवा मंडळ सह क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय सूर्यवंशी सल्लागार गं का. सोनवणे ,विजय सुतार व पत्रकार बांधवांनी पाठींब्याचे पत्र धरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांना दिले. मुस्लिम युवा मंडळाचे कार्यकर्ते आदिंसह पिंपळे येथिल श्री जय गुरुदेवदत्त भजनी मंडळाने दिवसभर जोरदार घोषणांच्या गजरात भजनाच्या साथीने साखळी उपोषण आंदोलन सुरू ठेवले.
चोपडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत विचखेडा,धुपे येथिल सरपंच देवकाबाई अहिरे,उपसरपंच निताबाई सपकाळे, वि.का.सोसायटी चेअरमन अशोक धनगर, सृष्टी पाणी वापर संस्थेचे चंद्रकांत पाटिल, सीताराम पाटिल, जिजाबराव पाटिल,अनिल बोरसे, विजय बोरसे,संजय पाटिल, कैलास शिरसाठ, एकलव्य संघटना चे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण अहिरे,ज्ञानेश्वर धनगर,राजेंद्र पाटिल,नवल कोळी,सुभाष पाटिल, रविंद्र बोरसे आदि ग्रामस्थांसह आंदोलनात सहभागी झाले.सौ.वसुंधरा लांडगे,सौ.प्रतिभा पाटिल यांनी पोवाडा म्हटला.हिरामण कंखरे यांनी धरनाच्या कविता म्हटल्यात.
तेली युवा समितीचे चेतन चौधरी, पंकज चौधरी, कमलेश चौधरी, पराग चौधरी, पराग चौधरी, अविनाश चौधरी, गणेश चौधरी, काशिनाथ चौधरी, ललित चौधरी, मुन्ना चौधरी, अमोल चौधरी, विकास चौधरी, उमेश चौधरी, अजय चौधरी, विशाल चौधरी, शिवाजी चौधरी, भावेश चौधरी, संतोष चौधरी आदिनीही उपोषनात सहभाग दिला.
खेडी वासरे येथिल महिला कविताबाई पाटिल,सौ.उज्वला पाटिल,सौ.राजकन्या पाटिल, सौ.सुनंदाबाई पाटिल, सौ.कमलबाई पाटिल, ग.भा.सुभद्रा गव्हाणे, सौ.रजूबाई पाटिल, यांच्यासह मुस्लिम समाजाचे शेख रियाजुद्दीन, गुलाम नबी, शराफत अली,अनिस खाटीक, मो.आसिफ शफी भाया, नाविद शे.मुशिरोद्दीन, लतिफ शेख तसेच भावसार समाजाचे अध्यक्ष सुरेश भावसार,सचिव नरेंद्र भावसार ,महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रविण महाजन, फुलमाळी समाज संस्था अध्यक्ष दिलीप पाटिल,अर्बन बँक चेअरमन लालचंद सैनानी, सुहास एलमामे, योगेश पाटिल, चंद्रकांत साळी, शिवाजीराव गांधलीकर, प्रा.गणेश पवार, कैलास चौधरी जळोद, प्रभाकर पाटिल,मालपूर, रोहिदास पाटिल,गलवाडे,डॉ.एल.डी. चौधरी,निम,पंडित बळीराम पाटिल पाडळसे, योगीराज पाटिल पढावद, दिपक पाटिल मंगरूळ आदिंसह कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.