Home राजकीय पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना होईल बरा : साध्वी प्रज्ञा ठाकूर

पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना होईल बरा : साध्वी प्रज्ञा ठाकूर

Sadhvi Pragya
Sadhvi Pragya


भोपाळ (वृत्तसंस्था) कोरोना बरा होण्यासाठी पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा असा उपाय, भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सुचवला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून कोरोना बरा होण्यासाठी हा उपाय सूचवला आहे.

 

 

खासदार साध्वी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


Protected Content

Play sound