पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथे या आदिवासी भिल्ल वस्तीत नुकतीच एका पाच वर्षीय चिमुकलीने दहावीत शिकणाऱ्या चुलत बहिण्याचा जीव वाचविला आहे. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धाबे येथिल छोटे किरणा दुकानदार दिपक माणकु भिल यांची मुलगी शितल गजानन हायस्कुल पारोळा या शाळेत इयत्ता १० वी शिक्षण घेत आहे. शीतल ही सकाळी नळ आल्यानंतर कपडे धुवुन गच्चीवर कपडे वाळविण्यासाठी टाकुन अंगावरील ओल्या कपडयांनिशी सुरू असलेल्या पाण्याच्या मोटारी जवळ पाईपावर पडलेले स्वतःचे कपडे घेण्यास गेली असता विद्युत प्रवाह सुरु असलेल्या पाण्याच्या मोटारीकडे ओढली जाऊन चिटकली.तेव्हा नेहमी त्यांच्या घरी वावरणारी सायली उर्फ चिवु ( वय ५ वर्ष ) ही शितल सोबत होती. शितल जोरात पडल्यामुळे सायलीने शितल पडली म्हणुन जोरात आरोळ्या मारुन मागच्या घरात असलेल्या शितलच्या आईला बोलाविले. त्या धावत आल्या. अनावधानाने शितलला उचलायला गेल्या तर त्याही झटका बसून दुर फेकल्या जावुन डोक्याला भिंतीचा मार बसला. सायलीने प्रसंगावधान राखत बाहेर धाव घेतली. अंगणात छोटया दुकानावर व मारूती ओट्यावर बसलेल्या लोकांना आवाज दिला. तेही घरात पळत आले. सायलीने प्रसंगावधान राखून विद्युत प्रवाह बटन बंद करण्याची खुण केली. बटन उंचावर असल्याने तीचा हात पुरत नव्हता. विद्युत प्रवाह बंद केला. शितलला उचलुन कॉटवर टाकले. ती बेशुध्द पडली होती. रडारड सुरू झाली. तेथे शेजारी त्यावेळी डॉ . प्रकाश काटे यांनी प्रथोमचार करून पुढील उपचारासाठी पारोळा रवाना केले. तेथे डॉ. मिलिंद भिका चौधरी, गोजराई हॉस्पिटल यांनी कु शितलवर योग्य उपचार करुन तीच्या प्रकृतीचा धोका टाळला. आज धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील,किसान कॉलेज पारोळ्याचे निवृत्त प्रो. विकास सोनवणे यांनी शितलच्या घराला भेट देवुन तीला हिंमत दिली. तीला आपल्या चिमुरडया चुलत बहिणीमुळे जीवदान मिळाले व तीचा एक प्रकारे पुर्नजन्म झाला म्हणुन तीचे व सायलीने तीचा जीव वाचविला म्हणुन मुख्याध्यापक साळुंखे यांनी ५५१ रू रोख बक्षिस व गुलाब पुष्प, शाल देवुन सत्कार, अभिनंदन व कौतुक केले .