पाच लाखासाठी विवाहितेला जिवंत जाळण्याची धमकी; शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे नाहीतर जीवंत जाळून टाकेल अशी धमकी विवाहितेला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील माहेर असलेल्या रुखसारबी शकीलखान मुलतानी वय-३० यांचे मेहरुण परिसरातील अक्सानगरातील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेजवळील रहिवासी शकील खान सिकंदर खान मुलतानी यांच्योबत विवाह झाला आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून व्यापारासाठी विवाहितेने माहेरुन ५ लाख रुपये आणायला लावले. परंतु पैसे आणले नाहीत म्हणू न विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. तसेच तुला जीवंत जाळून टाकू अशी धमकी देखील दिला जात होती. दरम्यान, हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेता माहेरी निघून आल्या होत्या. मंगळवारी त्यांनी शहर पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन पती शकील खान सिकंदर खान मुलतानी सासू शहनाजबी सिकंदरखान मुलतानी, नणंद शाहिस्ता शेहबाज खान, शबनमबी जाकीर खान, दीर शगीरखान सिकंदर खान, जाकीर खान सिकंदर खान सर्व रा. अक्सानगर मास्टर कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल बडगुजर हे करीत आहे.

Protected Content