पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे राहणाऱ्या विवाहितेला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील फत्तेपूर येथील माहेर असलेल्या वर्षा निलेश पाटील (वय-२८) यांचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातील बोरदता येथील निलेश लक्ष्मण पाटील यांच्यासोबत २०११ मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाची काही महिने चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर ५ लाख रुपये ट्रॅक्टर घेण्यासाठी आणावे असा तगादा पती निलेश लक्ष्मण पाटील यांनी केला. दरम्यान सासू सासरे यांनी देखील पैशांची मागणी करत त्रास दिला, हा त्रास सहन न झाल्याने अखेर विवाहिता माहेरी निघून आल्या. या संदर्भात शनिवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पहूर पोलीस ठाण्यात पती निलेश लक्ष्मण पाटील, अर्चना कमलेश पाटील, कमलेश पुरुषोत्तम पाटील आणि चुनीलाल शंकर सूर्यवंशी सर्व राहणार भोरदता ता.तळोदा जि.नंदुरबार यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.

Protected Content