पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खुपचंद साहित्या नगरातील विवाहितेला शेती घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपयांची मागणी करत छळ केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील खुपचंद साहित्या नगर येथील माहेर असलेल्या प्रियंका रामेश्वर राठोड (वय-२१) यांचा विवाह औरंगाबाद जिल्हृयातील देव्हारी येथील रामेश्वर साहेबराव राठोड यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही महिने चांगले गेले. त्यानंतर पती रामेश्वर राठोड याने पत्नीला माहेरहून शेती घेण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान विवाहितेने माहेरहून पाच लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात केली. तसेच सासू, सासरे, नणंद आणि दिर यांनी देखील पैश्यांसाठी विवाहितेकडे तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी ४ सप्टेंबर रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यो गाठले. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती रामेश्वर साहेबराव राठोड, सासू सुमनबाई साहेबराव राठोड, सासरे साहेबराव नथ्थू राठोड, नणंद लक्ष्मी शाम पवार आणि दीर ईश्वर साहेबराव राठोड सर्व रा. देव्हारी ता.जि.औरंगाबाद यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Protected Content