जळगाव प्रतिनिधी । प्लॉट आणि नोकरीसाठी पाच लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालालेली माहिती अशी की, पिडीत विवाहिता ही २६ वर्षीय असून शहरातील कांचननगर येथे आईवडिलांकडे राहते. विवाहितेचे पती महेंद्र नंदलाल कोळी रा. भोरगाव ता.चोपडा हे सैन्य दलात नोकरीला आहे. १० ऑक्टोबर २०१५ पासून ते २१ जानेवारी २०२० दरम्यान पिडीत विवाहितेला तिचे पती महेंद्र कोळी याने शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. लहान भाऊ प्रविण कोळी याला नोकरीसाठी माहेरहुन ५ लाख रूपये आणावे असा तगादा लावला होतो. याला कंटाळून विवाहिता ही २१ जानेवारी २०२० पासून माहेरी आईवडीलांकडे राहते. पत्नी माहेरी आल्यानंतरही त्यान मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. व्हॉटस्ॲपवर शिवीगाळ, ब्लॅकमेल व अश्लिल शब्द वापरून मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. व्हॅट्सॲपवर केलेले चॅटिंगचे स्क्रिनशॉट पोलीसांना दाखविले. पिडीतेच्या फिर्यादीवरून पती महेंद्र नंदलाल कोळी, सासु लताबाई उर्फ रामबाई नंदलाल कोळे, सासरे नंदलाल रामदास कोळी आणि दीर प्रविण नंदलाल कोळी यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सलिम पिंजारी व रविंद्र पाटील करीत आहे.