पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील हिवरा नदी पात्रालगतच्या पांचाळेश्वर मंदिराजवळ एका अनोळखी तरुणाचा पाय घसरून नदी पात्रात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. गोपाल जाधव हे करीत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ५ रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजेच्या सुमारास हिवरा नदीजवळील पांचाळेश्वर मंदिरालगतच्या फरशी वरुन जात असतांना एका तरुणाचा (अंदाजीत वय – २२ वर्ष) अचानक पाण्याचा वेग वाढल्याने त्याचा तोल जावुन तो पाण्यात सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहत गेला. प्रथमदर्शनी नागरिकांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी शहरातीलच त्रंबकनगर जवळ त्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. त्यास रुण्गवाहीका चालक अमोल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅं. गोपाल जाधव हे करीत आहे.