पाचोऱ्यात संविधान दिवस उत्साहात साजरा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचे आदेशाने पाचोरा तालुका विधी सेवा समिती, वकिल संघ पाचोरा तसेच एस. एस. एम. एम. महाविद्यालय पाचोरा यांचे संयुक्त विदयमाने “संविधान दिवस” २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाचोरा येथील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी मंचावर तालुका विधी सेवा समिती, अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे, २ रे सह न्यायाधीश एल.व्ही.श्रीखंडे, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, सचिव राजेंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी प्रास्तविक करून संविधानाचे महत्व स्पष्ट केले. नंतर मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी संविधानाचे प्रास्तविकेचे वाचन केले. यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे यांनी प्रास्तविकेचे स्पष्टीकरण करून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सांगितले. यानंतर जेष्ठ विधिज्ञ अॅड. सुनील पाटील यांनी अनुच्छेद २१ विषयावर तसेच मा. न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी अनुच्छेद ५१ यांवर विस्तृत माहिती दिली. यानंतर मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी अनुच्छेद ३९ व संविधानाची गरज तसेच विधी सेवा समितीची कार्य स्पष्ट केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पाटील यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला अॅड. एस. बी. माहेश्वरी, अॅड. एस. ए. सौदाने, अॅड. अनुराग काटकर, अॅड. रनसिंग राजपूत, अॅड. एम. पी. सिद्धू, अॅड. अंकुश कटारे, अॅड. स्वप्नील पाटील, अॅड. अनिल पाटील, अॅड. अविनाश सुतार, अॅड. चंद्रकांत पाटील, अॅड. कविता रायसाकडा, अॅड. भाग्यश्री महाजन, अॅड. मीना सोनवणे, अॅड. माधुरी पाटील, अॅड. कल्पना खेडकर, अॅड. सुकेशीनी मोरे, अॅड. माधुरी जाधव, पी. एल. व्ही. कु. चंचल पाटील, कु. भाग्यश्री महालपुरे, उपप्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. डॉ. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. डॉ. माणिक पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्निल भोसले, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. गौतम निकम, प्रा. जितेंद्र सोनवणे, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. उर्मिला पाटील, प्रा. रोहित पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे सहाय्यक दिपक तायडे, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील, महाविद्यालय कर्मचारी सुरेंद्र तांबे, जयेश कुमावत, वकील संघ, पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content