पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा येथील अजय विसपुते याने हनुमान जयंतीचे औचित्य साधून कृष्णधवल रंगसंगतीत पवनपुत्र हनुमाची रांगोळी काढली.
ही रांगोळी ५ फूट बाय ४ फूट आकाराची असून त्यासाठी अजय विसपुते यांना १८ तासाचा कालावधी लागला आहे. जगावर आलेल्या कोरोना संकटात प्रत्येकाला लढण्यासाठी शक्ती आणि कुटुंबावर आलेल्या संकटात प्रत्येकाला सहनशक्ती मिळावी ही अजयने बजरंगाच्या चरणी प्रार्थना केली आहे.
सर्वांनी काळजी घ्या. रंगश्री आर्ट फौंडेशन परिवारातर्फे तसेच परिसरातुन अजय विसपुतेचे कौतुक केले जात आहे.