आधार कार्डवरील पत्ता बदलणे झाले आणखी सोपे

dami aadhar card

मुंबई, वृत्तसंस्था | बँक खाते उघडण्यापासून ते विविध योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. पण तुम्ही आधार कार्डवर दिलेल्या पत्त्याहून दुसरीकडे वास्तव्यास असाल तर अनेकदा अडचण येते. त्यामुळेच आधार कार्डवरील पत्ता बदलणे आता आणखी सोपे करण्यात आले आहे. आता जी व्यक्ती आधार कार्डसह स्वतःच्या सहीने अर्ज (Self Declaration)देऊ शकत असेल, त्या व्यक्तीला आता आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची आवश्यकता नाही.

 

नव्या नियमानुसार, आधार कार्डवरील पत्ता बदलणेही सोपे झाले आहे. कारण, यूआयएडीआयकडून तुम्ही दिलेला अर्ज ग्राह्य धरुनच पत्ता बदलला जाईल. यासाठी भाडे करार किंवा इतर कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीला पत्ता बदलायचा आहे, त्यांना आधार केंद्रावर जाऊन स्वतःच्या सहीने अर्ज द्यावा लागेल आणि तुमचा पत्ता बदलला जाईल. दरम्यान, लवकरच ही सुविधा आनलाईनही दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Protected Content