Home Cities पाचोरा पाचोऱ्यात खा. संजय राऊतांच्या प्रतिमेला “जोडा मारो’ आंदोलन

पाचोऱ्यात खा. संजय राऊतांच्या प्रतिमेला “जोडा मारो’ आंदोलन

0
37

पाचोरा – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत खा. श्रीकांत शिंदे व आ. संजय शिरसाठ यांचे नाव येताच अशोभनीय कृत्य केल्याच्या कारणावरून आज खा. राऊतांच्या प्रतिमेला “जोडा मारो’ आंदोलन करण्यात आले.

खा. श्रीकांत शिंदे व आ. संजय शिरसाठ यांचे पत्रकार परिषदेत नाव येताच खा. संजय राऊत यांनी केलेल्या अशोभनीय कृत्याचा पाचोरा शिवसेनेतर्फे (शिंदे गट) आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहिर निषेध करण्यात आला. खा. संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारत व त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. याप्रसंगी आ. किशोर पाटील, मा. नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, वाल्मिक पाटील, बापु हटकर, मा. पंचायत समिती सभापती सिकंदर तडवी, जितु पाटील, जय बारावकर, प्रविण वाघ, सुमित सावंत, सुरज शिंदे, लक्ष्मण शिंदे, अनिल राजपुत, राहुल महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound