पाचोऱ्यात कोरोनाचा संसर्ग वाढला; जिल्ह्यात ५४० बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये एकाच दिवशी तब्बल ५४० आढळून आले आहेत. यात जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव आणि जळगाव शहरात संसर्ग वाढला आहे. तर आजच ४५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ५४० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ८० रूग्ण हे पाचोरा तालुक्यात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव -७२, चाळीसगाव-६९, अमळनेर-५३ असे आढळून आले आहे.

संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-७२; जळगाव ग्रामीण-९; भुसावळ-३९; चोपडा-१८; पाचोरा-८०; भडगाव-४१; धरणगाव-१०; यावल-१; एरंडोल-२९; जामनेर-१९; रावेर-१७; पारोळा-५९; चाळीसगाव-६९; मुक्ताईनगर-१६; बोदवड-५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २०२२७ इतकी झालेली आहे. यातील १३९७७ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ४५० रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १२ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७०० इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५५५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner

Protected Content