पाचोऱ्यात “एक शाम शहीदो के नाम” विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्याची राजधानी मुंबई येथे २६ / ११ च्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाचोरा पोलिस बॉईज असोसिएशन व ग्रीन अॅपल्स इव्हेंट्स अॅण्ड इंटरटेन्टमेंट यांचे तर्फे “एक शाम शहीदो के नाम” या देशभक्तीपर गितांचे आयोजन करण्यात आले होते.

 

२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील पोलिस कवायत मैदानावर आयोजित “एक शाम शहीदो के नाम” या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमास येथील उद्योजक मुकुंद बिल्दीकर, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, मा. नगरसेवक भुषण वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, गणेश पाटील, अजहर खान, सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, सुमित किशोर पाटील, आदित्य बिल्दीकर, प्रमोद सोनार, पाचोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे,  यांचेसह पोलिस कर्मचारी, परिसरातील आजी / माजी सैनिक, महिला, पुरुष, युवक व युवती उपस्थित होते.

 

या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रध्दांजली म्हणुन त्यांच्या स्मृती स्थळास पुष्पहार अर्पण करत तसेच “भारत माता की जय” या जय घोषाने करण्यात आली. देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमात पोलिस कर्मचारी संघपाल तायडे यांनी गायलेल्या तसेच जळगांव पोलिस बॉईज ऑर्केस्टामधील गायकांनी गायलेल्या देशभक्तीपर गितांनी उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गितांसोबतच येथील गुरुकुल स्कुलच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीं मन हेलावून टाकणारे २६ / ११ च्या हल्ल्याचे चित्रीकरण केले. याप्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. पोलिस बाॅईज असोसिएशन व ग्रीन अॅपल्स इव्हेंट्स अॅण्ड  इंटरटेन्टमेंट यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “एक शाम शहीदो के नाम” या उपक्रमाचे परिसरातुन कौतुक केले जात आहे.

Protected Content