नागरिक व प्रवाश्यांसाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध करा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव रेल्वे स्टेशनवरील छत्रपती शिवाजीनगर बाजूने नागरिकांना व प्रवाश्यांसाठी सोयीस्कर मार्ग त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष व डीआरयुसीसी सदस्य यांनी विनायक पाटील यांनी  डीआरएम व एमडीआरएम यांच्याकडे केली.

 

जळगाव रेल्वे स्टेशनवरील छत्रपती शिवाजीनगरच्या बाजूने येण्याजाण्यासाठी बऱ्याच दिवसापासून नागरिकांना व प्रवाश्यांना  त्रास होत आहे. या संदर्भात धर्मरथ फाउंडेशनचे  अध्यक्ष व डी.आर.यु.सी.सी सदस्य विनायक पाटील यांनी भुसावळ डिव्हिजनचे डी.आर.एम एस.एस.केडिया व ए.डी.आर.एम मीना यांच्याकडे छत्रपती शिवाजीनगर ते दूध फेडरेशन व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी/पॅसेंजर रेल्वे स्टेशनवर येण्या जाण्यासाठी सोयीस्कर रस्त्याबाबत चर्चा करून तो उपलब्ध द्यावा अशी मागणी केली. यावेळी डीआरएम एस.एस.केडिया यांनी येत्या दोन-तीन महिन्यात लवकरच आम्ही काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले असल्याचे विनायक पाटील यांनी कळविले आहे.

 

Protected Content