पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महागाईची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
पेट्रोल – डिझेल, गॅस, भाजीपाला, खाद्य तेल तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अच्छे दिनचा जूमला देत या देशाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारच निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना, अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा दि. २१ रोजी सकाळी १०:३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या प्रतिकात्मक अंतयात्रेत शिवसैनिक व महागाईने त्रस्त जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.